-बरे झाल्याने तब्बल 128 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र व नगरपालिका क्षेत्रात बुधवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 344 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 128 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
ग्रामीण क्षेत्रात 3281 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 344 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2937 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 344 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 204 पुरुष आणि 140 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6531 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 52107
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6531
-प्राप्त तपासणी अहवाल : 51971
-प्रलंबित तपासणी अहवाल : 136
-निगेटिव्ह अहवाल : 45441
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 189
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2653
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 3689
Previous Articleजूनमध्ये औद्योगिक उत्पादन घटले
Next Article लावाचे 2 फिचर फोन्स भारतात दाखल








