प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज बुधवारी एकाच दिवशी 20 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 394 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 234 पुरुष, 160 स्त्रियांचा समावेश आहे. आज 20 तर आतापर्यंत 439 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 14 हजार 916 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3645 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3251 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 394 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 14 हजार 916 रुग्णांपैकी 9 हजार 76 पुरुष, 5 हजार 840 स्त्री आहेत. आतापर्यंत 439 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 9 हजार 955 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 743
मंगळवेढा- 627
बार्शी – 2833
माढा- 1360
माळशिरस – 1917
मोहोळ- 702
उत्तर सोलापूर – 565
करमाळा- 964
सांगोला – 842
पंढरपूर 3266
दक्षिण सोलापूर – 1097
एकूण – 14,916
होम क्वांरटाईन – 6313
एकूण तपासणी व्यक्ती- 119371
प्राप्त अहवाल- 119222
प्रलंबित अहवाल- 149
एकूण निगेटिव्ह – 104306
कोरोनाबाधितांची संख्या- 14,916
रुग्णालयात दाखल – 4,522
आतापर्यंत बरे – 9,955
मृत – 439
Previous Articleकर्नाटक: उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते २२ वैद्यकीय उपकरणांचे अनावरण
Next Article सोलापूर शहरात 72 पॉझिटिव्ह, 4 मृत्यू









