सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात गुरुवारी एकाच दिवशी 608 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर आज 411 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 257 पुरुष, 154 स्त्रियांचा समावेश आहे. आज 9 तर आतापर्यंत 688 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 25 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2742 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2331 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 411 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 688 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 18 हजार 677जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1024
मंगळवेढा- 1184
बार्शी – 4710
माढा- 2591
माळशिरस – 4173
मोहोळ- 1079
उत्तर सोलापूर – 689
करमाळा- 1905
सांगोला – 1888
पंढरपूर 4928
दक्षिण सोलापूर – 1264
एकूण – 25, 435
होम क्वांरटाईन – 3935
एकूण तपासणी व्यक्ती- 188273
प्राप्त अहवाल- 188178
प्रलंबित अहवाल- 96
एकूण निगेटिव्ह – 162743
कोरोनाबाधितांची संख्या- 25, 435
रुग्णालयात दाखल – 6070
आतापर्यंत बरे – 18,677
मृत – 688
Previous Articleहणबरवाडी येथील माहिलेचा सर्प दंशाने मृत्यू
Next Article सातारा : भोगाव येथून 40 हजारांच्या तारेची चोरी









