प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात शनिवारी 453 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 277 पुरुष, 176 स्त्रियांचा समावेश आहे. आज 11 तर आतापर्यंत 561 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 20 हजार 378 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 782 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2940 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2487 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 453 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 20 हजार 377 रुग्णांपैकी 12 हजार 546 पुरुष, 7 हजार 832 स्त्री आहेत. आतापर्यंत 561 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 13 हजार 35 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 829
मंगळवेढा- 953
बार्शी – 3855
माढा- 2036
माळशिरस – 3015
मोहोळ- 895
उत्तर सोलापूर – 648
करमाळा- 1494
सांगोला – 1320
पंढरपूर 4145
दक्षिण सोलापूर – 1188
एकूण – 20, 378
होम क्वांरटाईन – 5556
|
एकूण तपासणी व्यक्ती- 156151
प्राप्त अहवाल- 156053
प्रलंबित अहवाल- 98
एकूण निगेटिव्ह – 135675
कोरोनाबाधितांची संख्या- 20, 378
रुग्णालयात दाखल – 6782
आतापर्यंत बरे – 13035
मृत – 561
Previous Articleसोलापूर शहरात मास्कची सक्ती करा – पालकमंत्री
Next Article अभिनेत्री संजनाला ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी









