प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवारी 411 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 166 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 12 हजार 125 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 2914 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 411 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2503 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 411 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 250 पुरुष आणि 161 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12124 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 95009
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 12125
-प्राप्त तपासणी अहवाल : 94876
-प्रलंबित तपासणी अहवाल : 133
-निगेटिव्ह अहवाल : 82751
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 349
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3110
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 8666
Previous Articleरत्नागिरी जिल्ह्यात आज १४२ पॉझिटिव्ह
Next Article सातारा जिल्ह्यात 373 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज









