सोलापुर / प्रतिनिधी
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवारी 258 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 235रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात1664जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 258 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1406जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 258 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 164 पुरुष आणि 94 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8380 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 66884
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8380
-प्राप्त तपासणी अहवाल : 66772
-प्रलंबित तपासणी अहवाल : 162
-निगेटिव्ह अहवाल : 58343
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 237
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2877
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 5266
Previous Articleकोल्हापुर ते मुझफ्फरपुर साप्ताहिक किसान रेल धावणार
Next Article सोलापूर शहरात नव्याने २९ पॉझिटीव्ह







