एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 33, 214 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज रविवारी 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 113 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 77 पुरुष, 36 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 984 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 33 हजार 214 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 849 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
आज 914 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 801 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 113 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 984 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 30 हजार 381 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1148
मंगळवेढा- 1475
बार्शी – 6063
माढा- 3476
माळशिरस – 5848
मोहोळ- 1669
उत्तर सोलापूर – 746
करमाळा- 2084
सांगोला – 2550
पंढरपूर 6688
दक्षिण सोलापूर – 1467
एकूण – 33,214
होम क्वांरटाईन – 21800
एकूण तपासणी व्यक्ती- 282091
प्राप्त अहवाल- 282056
प्रलंबित अहवाल- 35
एकूण निगेटिव्ह – 248843
कोरोनाबाधितांची संख्या- 33,214
रुग्णालयात दाखल – 1849
आतापर्यंत बरे – 30, 381
मृत – 984









