प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूने बाधित रुग्णांची संख्या व मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच यापुढेही कोविड-19 अटकाव करण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामकाजाची व नियंत्रणाची जबाबदारी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे दिली आहे. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी 27 ऑगस्ट रोजी दिले आहेत.
शासन निर्देशानुसार १ ते १५ युपीएचसी सेंटरच्या कार्यक्षेत्रांतर्गत सर्वेक्षणाचे कामकाज करण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या कामकाजासाठी शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यातील नियुक्त अधिकारी – कर्मचारी, वैद्यकिय अधिकारी त्यांच्याकडील जबाबदारी योग्यरित्या पार पाडतात किंवा नाही ? शासन निर्देशानुसार सर्वेक्षणाचे कामकाज होऊन आवश्यक ते अहवाल कोविड -१९ कंट्रोल रुम, शासनाकडे पाठविले जातात किंवा नाही, याबाबींवर देखरेख व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
त्यामूळे स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे युपीएचसी सेंटरकडे सर्वेक्षणाच्या कामकाजावरील देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे. ढेंगळे-पाटील यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थीत व बिनचुक पार पाडावी. अन्यथा सदर कामकाजामध्ये कुचराई केल्यास आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ व अन्य अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
Previous Articleगोकुळ शिरगावने उमदा बॉक्सिंगपट्टू गमावला
Next Article लॉकडाऊन काळातही मुलं असुरक्षित ?









