प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, ऑक्सिजन सिलेंडर, संक्शन यंत्रणा आणि पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा तत्काळ व सतत पुरवठा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समन्वय अधिकारी, सहायक तालुका नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
यापूर्वी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांची समितीचे समन्वय अधिकारी, समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यचे उपसंचालक प्रमोद सुरसे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव आणि एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी शिवाजी राठोड यांचा समावेश होता. आता त्यांना मदत करण्यासाठी सहायक तालुकानिहाय नियंत्रण अधिकारी नियुक्त केले आहेत.
पुढीलप्रमाणे कामे करणे अपेक्षित आहे. नेमून दिलेल्या डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अव्याहत सुरू राहील, यासाठी पुरवठादार आणि कोविड केंद्रे, रूग्णालये यांच्याशी समन्वय ठेवणे.नेमून दिलेल्या डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात रूग्ण संख्येनुसार ऑक्सिजन आणि सिलेंडरची मागणी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून निश्चित करून पुरवठादाराकडे पाठपुरावा करणे.
ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित करणे. नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात वाढ किंवा घट झाल्यास त्याप्रमाणे नियोजन करून ऑक्सिजन पुरवठा अव्याहत सुरू ठेवणे. समन्वय अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन मागणी आणि पुरवठा याचा दैनंदिन अहवाल जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाला दुपारी 3 वाजेपर्यंत पाठवावा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









