तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज मंगळवारी 337 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 199 पुरुष, 73 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 419 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 14 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 220 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3764 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3427 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 337 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 14 हजार 522 रुग्णांपैकी 8 हजार 842 पुरुष, 5 हजार 680 स्त्रिया आहेत. आतापर्यंत 419 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 9 हजार 683 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे –
अक्कलकोट – 737
मंगळवेढा- 597
बार्शी – 2759
माढा- 1303
माळशिरस – 1861
मोहोळ- 693
उत्तर सोलापूर – 563
करमाळा- 916
सांगोला – 787
पंढरपूर 3217
दक्षिण सोलापूर – 1089
एकूण – 14,522
होम क्वांरटाईन – 6413
एकूण तपासणी केलेली व्यक्ती- 115577
प्राप्त अहवाल- 115432
प्रलंबित अहवाल- 145
एकूण निगेटिव्ह – 100910
कोरोनाबाधितांची संख्या- 14,522
रुग्णालयात दाखल – 4220
आतापर्यंत बरे – 9683
मृत – 419









