तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
उत्तर प्रदेश हथसर येथील तरुणीवर झालेल्या अमानवी सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ सोलापुरात ज्येष्ठ कामगार नेते माकपचे केंद्रीय समिती सदस्य, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका कॉ. नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे, काळ्या फिती लावून निदर्शन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, विद्यार्थी आघाडी यांच्यामार्फत उत्तर प्रदेश हथसर येथील तरुणीवर झालेल्या अमानवी सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली.








