सोलापूर : प्रतिनिधी
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करुनसार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास कोरोनाचा धोका होऊ शकतो. त्यामूळे तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ विक्रीस मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी नियम-अटींसह परवानगी दिली आहे. यासंबंधीचे आदेश त्यांनी मंगळवारी जारी केले.
आदेशात म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रात तंबाखु व तंबाखुजन्य इत्यादी धुम्रपानाचे पदार्थ विक्री करणारे सक्षम प्राधिकरणाचे परवाना प्राप्त दुकाने, पानटप-या इत्यादींना नियम, अटी व शर्थीच्या अधीन राहून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे. दुकानदार व ग्राहकांनी चेह-यावर मास्क, रुमाल वापरणे बंधनकारक आहे. याठिकाणी येणा-या ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर असावे. दुकाना व टपरी समोर गर्दी होणार नाही याची जबाबदारी संबंधीत दुकानधारक यांची राहिल. सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यास बंदी असून पान टपरी, दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांनी धुम्रपान केल्यास, थुंकल्यास संबंधीत दुकानदारावर सक्षम प्राधिका-यामार्फत दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.
“पान टपरी, दुकानांच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास कायद्यान्वये गुन्हा आहे” अशा आशयाचा फलक लावणे बंधनकारक आहे.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 53 जणांना डिस्चार्ज, कोरोनाचे चार बळी
Next Article खानापूर तालुक्यात कोरोनामुक्तीचे अर्धशतक








