तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात रविवारी नव्याने 48 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 9 पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 264 वर पोहचली असून उर्वरित 209 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दरम्यान आज रूग्णालयातून 12 जण तर आतापर्यंत 41घरी सोडण्यात आले.
आज 9 पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . एकूण 132 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 84 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 48 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजच्या कोरोना चाचणीत 29 पुरुष , 19 महिला पॉझिटिव्ह आढळले .
संजीवनगर एमआयडीसी, गजानन नगर जुळे सोलापूर, बजरंग नगर होटगी रोड, सम्राट चौक आंबेडकर उद्यानजवळ, मंत्री चंडक पोलीस कॉलनी, रविवार पेठ, पोलीस वसाहत मुरारजी पेठ, समृध्दी हेरिटेज जुळे सोलापूर, निर्मिती टॉवर मोदी खाना, अश्विनी हॉस्पिटल ग्रामीण कुंभारी, लोकसेवा शाळेजवळ, बुधवार पेठ मिलिंद नगर, तेलंगी पाच्छा पेठ, तुळशांती नगर विडी घरकुल, सिध्दार्थ चौक कुमारस्वामी नगर, निलम नगर, मोदीखाना, गवळी वस्ती कुंभारी रोड, कुंभारी नाका, सिव्हील हॉस्पिटल कॉर्टर, मुलींचे वसतीगृह होटगी नाका, सहारा नगर मजरेवाडी, शिवाजीनगर मोदी, पाटकूल मोहोळ, धाकबाभुळगांव मोहोळ, सावळेश्वर मोहोळ येथील प्रत्येकी 1 रूग्ण मिळाला आहे तर सिध्देश्वर पेठ येथे 6 पुरूष, 2 महिला, सदर बझार लष्कर येथे 2 पुरूष, 2 महिला, शास्त्रीनगर येथे 3 पुरूष, 4 महिला, हुडको कॉलनी कुमठा नाका 1 पुरूष, 1 महिला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 264 मध्ये 152 पुरूष तर 112 महिला आहेत. मृतांची संख्या 14 आहे. 209 व्यक्ती उपचार घेत आहेत. एकाच दिवशी 48 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळेे शहर जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सोलापुरातील कोरोना सद्यस्थिती
-होम क्वारंटाईनमध्ये : 2431
-एकूण अहवाल प्राप्त : 3124
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2708
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 264
-अहवाल प्रलंबित : 152
बरे होऊन घरी गेले : 41
मृत- 14








