बार्शी बाजार समितीत आवक कमी; उडीद पिकास साडेसात हजारांचा दर
बार्शी / प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी येथे सोयाबीन या पिकास प्रतिक्विंटल 11 हजार 511 रुपये असा भाव निघाला होता. बार्शी बाजार समितीत सोयाबीनला इतका उच्चांकी भाव मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.
बार्शी बाजार समिती ही खूप जुनी व मोठी बाजार समिती असून बार्शीसह शेजारील तालुके व जिल्हे येथूनही बार्शी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येत असतो. बार्शी शेजारील परंडा, भूम, वाशी, उस्मानाबाद, माढा या तालुक्मयातून तर अगदी लातूर-नांदेडपासून शेतमाल बार्शी बाजार समितीत येत असतो. याचे कारण की बार्शी बाजार समितीत खरेदीदार जास्त असून महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यांतूनही खरेदीदार या बाजार समितीत येत असतात. त्यातच सोयाबीनची आवक कमी झाल्याने सोयाबीनला उच्चांकी भाव प्राप्त झाला आहे. सोयाबीनला 11 हजार 511 इतका उच्चांकी भाव मिळाला. त्याचप्रमाणे बार्शी बाजार समितीत उडीद या पिकाचीसुद्धा विक्रमी आवक झाली असून 11 हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. उडीद या पिकास साडेसहा ते साडेसात हजार रुपये इतका भाव मिळत आहे. यावषी पाऊस जास्त झाल्याने उडीद हे पीक धोक्मयात आले असून आवक घटण्याची शक्मयता आहे. त्यामुळे उडीदलाही चांगला भाव मिळण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.









