तालुक्यातील 127 जणांना लागण : सक्रिय रुग्णसंख्येतही घट
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. बुधवारी 389 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1097 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ातील आणखी 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येतही घट होत चालली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 71 हजार 817 वर पोहोचली आहे. बुधवारी वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमधून 1097 जणांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत 63 हजार 54 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 8 हजार 100 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी बहुतेक जणांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
बुधवारी एका बेळगाव तालुक्मयातील 127 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहर व उपनगरांतील 89 व ग्रामीण भागातील 38 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत चिकोडी तालुक्मयातील चार, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी, सौंदत्ती तालुक्मयातील प्रत्येकी एक अशा एकूण आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. सांबरा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, होनगा, बस्सापूर, गणेशपूर, बेनकनहळ्ळी, होनीहाळ, हिंडलगा, हिरेबागेवाडी, खादरवाडी, कंग्राळी बी. के., मच्छे, मोदगा, पिरनवाडी, यरमाळ, शहापूर, भवानीनगर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ, बसव कॉलनी, भाग्यनगर, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, सहय़ाद्रीनगर, संगमेश्वरनगर परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
शास्त्राrनगर, शिवबसवनगर, श्रीनगर, शिवाजीनगर, बिम्स कॅम्पस्, बॉक्साईट रोड, देवराज अर्स कॉलनी, कॅम्प, चिदंबरनगर, जुने बेळगाव, कलमेश्वरनगर, खासबाग, कुमारस्वामी लेआऊट, नाझर कॅम्प-वडगाव परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
243 जणांवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम मोडणारी 33 वाहने बुधवारी पोलिसांनी जप्त केली आहेत. तर विनामास्क फिरणाऱया 243 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली आहे.