ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने प्रति १० ग्रॅम ५६२०० रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. पण आज त्याची किंमत सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे अकरा हजार रुपयांनी कमी आहे. आज सोन्याचा वायदा बाजारातील भाव प्रति १० ग्रॅम ४४,७६० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच सात महिन्यांत सोन्याचे भाव ११,५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
यावर्षी सोन्याच्या भावात ५५४० रुपयांची घट
जानेवारी २०२१ रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५०,३०० रुपये होता. या वर्षी एक जानेवारीपासून सोने ५,५४० रुपयांनी कमी झाले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत चांदी महाग झाली आहे. त्यात सुमारे २२६० रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारीला चांदीचे वायदे ६६,९५० रुपये होते, जे आता प्रति किलो ६७,०७३ रुपयांच्या आसपास आहेत.