पाच दिवसांच्या उसळीनंतर वायदे बाजारात आज सोन्याचे दर 1.34 टक्क्मयांनी म्हणजेच 584 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव 42 हजार 936 रुपयांवर आला आहे.
चांदीचे दरही 1.6 टक्क्मयांनी घसरले असून, एक किलो चांदीची किंमत 48,580 रुपये एवढी आहे. मागील पाच दिवसांत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ पहायला मिळत होती. सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 43,788 रुपयांवर गेला होता. त्यामध्ये आता 584 रुपयांची घसरण झाली.
मागील दहा दिवसात सोने 2100 रुपयांनी महागले होते. तर चांदीतही 3000 रुपयांची वाढ झाली होती. चीनमधील कोरोना व्हायरस, अमेरिका-इराणमधील तणाव यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गुंतवणूकदारांनी ‘प्रॉफिट बुकिंग’ला पसंती दिल्याने आज सोन्याचे दर खाली आले आहेत.