मोफत जीजेईपीसी ओळखपत्र नेंदणीला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरसह राज्यातील सोने चांदी कारागीरही आता केंद्र आणि राज्य शासनाच्या कक्षेत आले आहे. महाराष्ट्र व भारत सरकारच्या अधिकृत जेम्स अँड ज्वेलेरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या (जीजेईपीसी) वतीने राज्यभरातील सोने, चांदी कारागीरांचा अधिकृत नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामध्ये जीजेईपीसीचे कार्ड देण्यात येते. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थी कारागीरांना पंचवीस हजाराच्या मोफत मेडिक्लेमसह पंधराहून अधिक योजनांचा लाभ होणार आहे. सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने जिल्ह्य़ात नोंदणीचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यामध्ये अडीचशे कारागीरांनी नोंदणी केली.
नोंदणी प्रक्रिवेळी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन अध्यक्ष नचिकेत भुर्के, दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष सुधाकर पेडणेकर, सोने चांदी कारागीर असोसिएशन उपाध्यक्ष प्रकाश घाटगे, सचिव गोपीनाथ नार्वेकर, खजानिस विजय औंधकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय म्हसवेकर, सहसचिव सचिन ढणाल, भगवान निंबाळकर, वीरेंद्र मोहिते, सौ. सविता पाटील, संजय नार्वेकर, चंद्रकांत नार्वेकर, पंढरीनाथ कारेकर व कोल्हापुरातील शेकडो सुवर्णकार बंधु मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.