बेंगळूर
लॉकडाऊनचा फटका सराफी व्यवसायालाही बसला असून गेल्या एप्रिलमध्ये सोने आयातीत 99 टक्के घट झाली आहे. गेल्या तीन दशकातील ही नीचांकी आयात समजली जात आहे. यंदा ऐन एप्रिल महिना कोरोनाशी लढण्यात गेला आहे. शिवाय आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे आयातीत घट झाली. दरम्यान मंगळवारी सोन्याच्या दरामध्ये किरकोळ घसरण झाली. दिसून आली. 170 रुपयांची सोने दरात प्रति 10 ग्रॅम घट झाली. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 45 हजार 743 रुपयांवर आला. दुसरीकडे चांदीच्या दरात 590 रुपये घट झाली आहे.









