बेंगळूर/प्रतिनिधी
२५ जुलै रोजी होणार्या सैन्यात भरतीसाठीची सामान्य प्रवेश परीक्षा (सीईई) पुढे ढकलण्यात आली आहे. बेंगळूर संरक्षण जनसंपर्क कार्यालयाच्या निवेदनानुसार सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे आणि मान्सूनच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सामान्य प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईईची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल” असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.









