प्रतिनिधी / सैनिक टाकळी
सैनिक टाकळी येथील एका माजी सैनिकाचा कोरोनावर सीपीआर मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर दुसरीकडे भारतीय विद्यापीठमध्ये छातीत कळ येत असल्याकारणामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अकिवाट येथील एका कर्मचार्याला पचारासाठी भरती केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. टाकळीत आत्तापर्यंत तिघेजण शिरोळ येथे आसोलेशन विभागांमध्ये आहेत. येथील एकूण संख्या मृत व्यक्ती सहित ५ पॉझिटिव्ह झाले आहेत.
टाकळी परिसरात टाकळीवाडी बुधवारी रात्री चौंडेश्वरी सुतगिरण येथे कामाला जाणाऱ्या दोन महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवे दानवाड चार, जुने दानवाड एक, खिद्रापूर येथे एक असे रोजच्या रोज पेशंट वाढत आहेत. त्यामुळे येथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








