इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी महिला
हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि निर्माती सेलेना गोमेझ सध्या चर्चेत आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक विक्रम केला आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी ती महिला ठरली आहे. याप्रकरणी तिने काइली जेनरला मागे टाकले आहे. परंतु यानंतर तिने चाहत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. सेलेनाने सोशल मीडियावरून बेक घेत असल्याची घोषणा केली ओ.
सेलेना गोमेझने इन्स्टाग्राम गेमध्ये काइली जेनरला पिछाडले आहे. सद्यकाणत सेलेनाला इन्स्टाग्रामवर 383 दशलक्ष लोक फॉलो करतात. तर काइलीचे इन्स्टाग्रामवर 380 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सेलेनापूर्वी हा विक्रम काइलीच्या नावावर होता.
याच दरम्यान सेलेनाने इन्स्टाग्रामवरून बेक घेत असल्याचे जाहीर केले आहे. मी अत्यंत आनंदी आहे, पूर्ण जगात माझे सर्वात चांगले मित्र आणि चाहते आहेत. मी जशी आहे, तशीच मला पसंत आहे असे सेलेनाने म्हटले आहे.
सोशल मीडियावरून मी ब्रेक घेत आहे. मी आता 30 वर्षांची असून सोशल मीडियासाठी काही प्रमाणात अधिक वयाची आहे. चाहत्यांवर मी प्रचंड प्रेम करते. मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटणार आहे. सध्यातरी मला प्रत्येक गोष्टीतून बेक घ्यायचा आहे असे सेलेनाने नमूद केले आहे. सेलेनाने यापूर्वीच मानसिक आरोग्याचा दाखला देत सोशल मीडिया बेक घेतला होता. 2014 मध्ये सेलेनाने आपण बायपोलर विकाराने त्रस्त असल्याचा खुलासा केला होता.