ऑनलाईन टीम / मुंबई :
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स सार्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 41893 अंकांवर पोहचला. तर निफ्टीनेही नवा विक्रम करत 12377 अंकांचा टप्पा गाठला. अमेरिका आणि इराणमधील विकोपाला गेलेला संघर्ष काहीसा निवळल्यानंतर शेअर बाजारात तेजीचे वातावरण दिसत आहे.
त्यामुळे गुंतवणुकदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी सेन्सेक्सने 270 अंकांची तर निफ्टीने 70 अंकांची उसळी घेतली आहे. आजच्या सत्रात अव्हेन्यू सुपरमार्ट, एसबीआय, एडलवाईज, इंडिया हौसिंग फायनान्स हे शेअर तेजीत आहेत.