गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींहून अधिक बुडाले
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि मोठय़ा प्रमाणातील बाजारातील समभाग विक्रीमुळे चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत विक्रमी घसरण नोंदवत बाजार बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 1,114.82 अंकांनी घसरुन निर्देशांक 36,553.60 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 326.30 अंकांनी घसरत निर्देशांक 10,805.55 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील होत असलेल्या घडामोडींचा परिणाम म्हणून देशातील शेअर बाजार मोठय़ा प्रमाणात कोसळत बंद झाले. फिनसेन फाईल लिक होण्याच्या कारणामुळे दबावात होत असलेल्या प्रवासामुळे जगभरातील प्रमुख बँकांची नावे समोर येत आहेत. तसेच यामध्ये अमेरिकी टेझरी विभागाचा संबंध राहिलेला आहे. यामुळे अमेरिकन बाजारात मोठी विक्री राहिली होती.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरले आहेत. यामध्ये अशोक लेलँड 7.74, टाटा मोटर्स 6.51, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 6.37, मारुती सुझुकी 3.19 आणि मदरसन सुमीचे समभाग 4.99 टक्क्मयांनी प्रभावीत राहिले आहेत. दिवसभरात 2,812 कंपन्यांचे समभागांमध्ये टेडिंग झाले आहे. तसेच यातील 624 कंपन्यांचे समभाग वाढीमध्ये 2026 कंपन्यांचे समभाग घसरले आहेत.
बाजारातील नकारात्मक प्रभावामुळे बीएसई लिस्टेट कंपन्यांचे बाजारातील भांडवल घटून 149.26 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. जे 16 सप्टेंबर रोजी 160.08 लाख कोटी राहिले होते.
गुंतवणूकदारांना फटका
मागील सहा सत्रात शेअर बाजारात सलगची घसरण राहिली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना जवळपास 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. गेल्या सहा सत्रात बीएसई सेन्सेक्सने जवळपास 2700 अंकांनी म्हणजे 7 टक्क्मयांची घसरण नोंदवली आहे.
तसेच गुरुवारी मात्र हा आकडा 1100 अंकावर राहिला होता.