टेक महिंद्राचे समभाग तेजीत : चढउताराचे वातावरण
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात दुसऱया दिवशी सेन्सेक्स व निफ्टी यांच्यात तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये विविध कंपन्यांच्या कामगिरीमध्ये प्रामुख्याने इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 210 अंकांनी वधारुन निर्देशांकाने विक्रमी टप्पा पार केल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 209.69 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 55,792.27 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 51.55 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 16,614.60 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच टीसीएस, नेस्ले इंडिया, टायटन, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
अन्य टप्प्यावरील स्थितीत आशियाई बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँग तसेच हँगसेंग दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे बाजार घसरणीसह बंद झाले आहेत. दुपारनंतर ट्रेडिंगमध्ये युरोपीय बाजार नुकसानीत राहिले होते. या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.24 टक्क्यांनी घसरुन 69.34 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहेत.
जागतिक प्रभाव
जागतिक पातळीवर गेल्या दोन दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी गोंधळ निर्माण करुन अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. याच घटनेमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा प्रभाव विविध देशातील राजकीय परिस्थितीवर निर्माण होत आहे. जागतिक पातळीवरील बाजारात वातावरण नकारात्मक निर्माण झाले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा… 1411
- टीसीएस…… 3552
- नेस्ले………. 18717
- इन्फोसिस…. 1741
- टायटन कंपनी 1873
- बजाज फिनसर्व्ह 14800
- बजाज ऑटो.. 3812
- एचसीएल टेक 1141
- एशियन पेन्ट्स 3013
- पॉवरग्रिड कॉर्प 183
- मारुती सुझुकी 6888
- डॉ.रेड्डीज लॅब 4701
- अल्ट्राटेक सिमेंट 7410
- बजाज फायनान्स 6408
- सन फार्मा…… 783
- एचडीएफसी. 2739
- कोटक महिंद्रा 1786
- अपोलो हॉस्पिटल 4920
- पेट्रोनेट एलएनजी 223
- ज्युबिलंट फूड 3898
- कमिन्स…….. 1018
- विप्रो…………. 634
- टोरंटो फार्मा. 3030
- सिप्ला……….. 904
- डाबर इंडिया.. 596
- कोलगेट……. 1685
- ब्रिटानिया…. 3696
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक. 1000
- एनटीपीसी….. 117
- भारती एअरटेल 626
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 790
- टाटा स्टील… 1503
- एचडीएफसी बँक 1514
- स्टेट बँक……… 421
- आयटीसी……. 209
- ऍक्सिस बँक…. 756
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2163
- आयसीआयसीआय 701
- वेदान्ता………. 302
- रिलायन्स इन्फ्रा 63