बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या वादग्रस्त सीडीची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाला १०० कोटी रुपयांचा सौदा अयशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात महिलेव्यतिरिक्त सात जणांचा सहभाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनी जारकिहोळी यांच्याशी संयुक्तपणे शंभर कोटी रुपयांचा व्यवहार करण्याची योजना आखली होती. जारकिहोळी यांनी हा करार स्वीकारला असता तर सीडी बाहेर येण्याची शक्यता नव्हती. जारकिहोळी यांना शिकार बनवण्यासाठी आरोपींनी दोन नामांकित व्यक्तींशी संपर्क साधला होता.
जास्तीत जास्त पैशाच्या आमिषात अडकले
आरोपीला पहिल्याच प्रयत्नात कोट्यावधी रुपये मिळविण्यात यश आले, त्यानंतर प्रचंड रक्कम मिळवण्याच्या लोभाने त्यांच्या मनात चक्र सुरु झाले. तथापि, जेव्हा जारकिहोळी यांनी करार करण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या आशा मावळल्या. यानंतर आरोपींनी जरीकिहोळीच्या विरोधकांकडेही संपर्क साधला होता.