अमरावती
प्लायवुड क्षेत्रातील दिग्गज कंपनी सेंच्युरी प्लायचा आंध्र प्रदेशात लवकरच कारखाना उभारला जाणार आहे. सेंच्युरी प्लायबोर्डस (इंडिया) लिमिटेडने वायएसआर कडप्पा जिल्हय़ात नव्या प्लाय निर्मितीचा कारखाना सुरू करण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 800 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.









