7.40 कोटी किलोमीटर अंतरावरून दिसू लागल्या ज्वाळा
ईएसए-नासाच्या सोलर ऑर्बिटरने 4 तासांमध्ये काढली छायाचित्रे
सूर्याचे आतापर्यंतचे सर्वात जवळून काढलेले छायाचित्र समोर आले आहे. यात सूर्याची फूल डिस्क इमेज म्हणजेच पूर्ण गोळय़ाचे छायाचित्र दिसून येत आहे. नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेच्या (ईएसए) सोलर ऑर्बिटरने 7 मार्च रोजी हे छायाचित्र टिपले आहे. सूर्यापासून 7.40 कोटी किलोमीटर अंतरावरून हे छायाचित्र काढण्यात आले आहे.

हा 25 छायाचित्रांचा एक मोजेक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यात आउटर ऍटमॉस्फियर आणि कोरोना एकत्र दिसून येत आहेत. हे छायाचित्र टिपण्यास 4 तासांहून अधिक वेळ लागला आहे, कारण या छायाचित्राची प्रत्येक टाइल्स तयार होण्यास सुमारे 10 मिनिटांचा कालावधी लागला आहे. यात प्रत्ये ठिकाणी छोटय़ा-छोटय़ा असंख्य ज्वाळा दिसून येत असून याद्वारे अंतराळ हवामानाची भविष्यवाणी करण्यास मदत होणार आहे.
छायाचित्र अंतराळ यानाच्या एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट इमेजरद्वारे काढण्यात आले आहे. सूर्यावर असलेल्या विविध वायूंचे वेगवेगळे तापमान असते. तर छायाचित्रांमध्ये पर्पल रंगाचा गोळा हायड्रोजन गॅस दर्शवित आहे. याचे तापमान 10 हजार अंश सेल्सिअस आहे. निळय़ा रंगाचा गोळा कार्बन दर्शवितो, याचे तापमान 32 हजार अंश सेल्अिस आहे. हिरव्या रंगाचा गोळा ऑक्सिजन वायू दर्शवत असून त्याचे तापमान 3.20 लाख अंश सेल्सिअस इतके प्रचंड आहे. पिवळा रंग नियॉन वायू दर्शवत असून त्याचे तापमान 6.30 लाख अंश सेल्सिअस आहे.









