प्रतिनिधी / ओटवणे:
ओटवणे तेरेखोल नदी पुलानजीक आपली इऑन कार लावून सावंतवाडी शहरातील एका खासगी बँकेचा कर्मचारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी कारमध्ये सापडली आहे. मनोहर गावडे असे या कर्मचाऱयाचे नाव असून तो मूळचा चौकुळचा आहे. तर कारिवडे भैरववाडीत आई-वडिल, पत्नी व मुलांसह राहतो. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलीस कॉन्स्टेबल राऊत आणि गवस घटनास्थळी दाखल झाले.









