ऑनलाईन टीम मुंबई :
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोरोना चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, रिया चा भाऊ शौविक याला याआधीच अटक करण्यात आली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी रिया चक्रवर्तीची मागील काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. तसेच तिच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी केली जात आहे.
चौकशी दरम्यान, रियाने एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली दिली. आपण BUD ने भरेलली सिगरेट ओढायचो हे तिने कबुल केले आहे. याचा अर्थ रिया गांजाची सिगरेट ओढत होती. सुशांतसोबत ही सिगरेट ओढत असल्याची कबुली तिने दिली.
रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळे हा खुलासा होऊ शकता आहे. एनसीबीने रियाच्या घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेंसिक चाचणीत ही माहिती समोर आली. दरम्यान, एनसीबी बॉलीवूड मधील 25 सेलिब्रिटींनाही चौकशीसाठी बोलावणार आहे.









