प्रतिनिधी/ बेळगाव
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे शुक्रवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. सांबरा विमानतळावरून ते थेट सुवर्णसौधला रवाना झाले. सुवर्णसौध येथे पोहोचल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मानवंदना स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नियोजित बैठकीत भाग घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा बेळगाव जिल्हापालकमंत्री गोविंद कारजोळ, उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री उमेश कत्ती, डॉ. के. सुधाकर, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस आयुक्त के. त्यागराजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.