सांखळी / प्रतिनिधी
कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या देशासमोरील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. आपली संस्कृती, जुनी विचारसरणी यास खतपाणी घालताना मागे वळून पाहण्याची आवश्यकता आहे. विविध सरकारी योजना आपणास आत्मनिर्भर कशा बनवू शकतात, याविषयी खास मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच सुर्ला आणि वेळगे ग्रामपंचायत पातळीवर झाला. गावातील जाणकार, अनुभवी, शेतकरी, महिला सदस्यांना याप्रसंगी निमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. प्रकाश वजरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. सुर्लाचे सरपंच कृष्णा बायेकर, वेळगेचे सरपंच गोविंद गावकर यावेळी उपस्थित होते.









