प्रतिनिधी/ मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची माजी पत्नी सुझेन खान, गायक गुरू रंधवा या बॉलिवुड सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांनी ड्रगन क्लबमध्ये मध्यरात्री पार्टी करताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी 34 जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती कायदा आणि सहव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
शहरात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत नाईट कर्फ्यु घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत आंतरराष्ट्रीय टर्मिटनल दोननजीक असलेल्या ड्रगन क्लबमध्ये पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या क्लबमध्ये छापा टाकला. मात्र याची म]िहती स्थानिक पोलिसांना समजताच, माहिती लिक होण्याची शक्यता होती. रात्रपाळीचे पोलीस उपायुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. तसेच सहार पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी वर्गदेखील मदतीला घेतला. यावेळी अनेक सेलिब्रिटी पार्टीमध्ये सहभागी झाले होते. छापा टाकल्यानंतर काही जण पळून जाताना प्रयत्न करत असताना मुंबई पोलिसांनी तातडीने अडवून त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये रॅपर बादशाह आपल्या मर्सिडीज कारमधून मागच्या गेटने पसार झाला. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा या प्रकरणात 34 जणांविरोधात दाखल करण्यात आला आहे.
जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलजवळील ड्रगन फ्लाय या क्लबमध्ये येथे पार्टी सुरू होती. याठिकाणी रेड केल्यावर सुझान खान, सुरेश रैना 34 जण पार्टी करत असल्याचे आढळले. त्यापैकी सात जण हे हॉटेलचा स्टाफ आहे. ही खाजगी पार्टी क्लबच्या मालकाने आपल्या नातेवाईक तसेच काही मोजक्या मित्रांसाठी ठेवली होती. या छापेमारीत झालेल्या कारवाईनंतर 17 महिलांना नोटीस सोडून देण्यात आले. तसेच इतरांना मात्र सहार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणीचे गुन्हेही दाखल केले आहेत.
पार्टी नहीं चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग! – मुंबई पोलिसांचे ट्विट
नेमके या घटनेचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी ट्विट करत रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल आधीच इशारा दिला आहे. तसेच ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग’, अशा प्रकारे पोलिसांनी मजेशिर ट्विट केले आहे.








