औंध :
अटीतटीच्या लढतीत धुमछडी आखाडय़ाच्या उंचपुर्या सुरज निकमने दुस्रया मिनिटाला कोल्हापूरच्या विजय गुटाळला घुटना डावावर पराभवाची धुळ चारुन औंधचे मैदान जिंकले. सर्वच कुस्त्या निकाली झाल्यामुळे कुस्तीशौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तब्बल साडेचार तास काटा कुस्त्यांचा थरार रंगला होता.
येथील श्रीयमाईदेवी यात्रेनिमित्त श्रीयमाईदेवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि कुस्ती कमेटीच्या वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती कुस्ती कमेटीचे अध्यक्ष वसंतराव माने, उपाध्यक्ष सदाशिव इंगळे, कार्याध्यक्ष नारायण इंगळे, हणमंतराव शिंदे, रमेश जगदाळे, संतोष भोसले, किसन आमले, प्रशांत खैरमोडे, राजेंद्र माने, अनिल माने, गणेश देशमुख, वसंत जानकर, दीपक नलावडे, किसन तनपुरे, आप्पा इंगळे, अमरशेठ देशमुख यांच्या उपस्थितीत लावण्यात आली.
बरोबर 8:26 वाजता प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. सलामीला समोरून दुहेरी पट काढण्याच्या प्रयत्नात विजय असताना सुरजने तो हाणून पाडला आणि त्याच्यावर ताबा घेऊन घुटना डावावर8:27 मिनिटाला विजयला आसमान दाखवून बाजी मारली. अतिशय चटकदार कुस्ती झाल्यामुळे कुस्तीशौकीनांनी जल्लोष केला. दुस्रया क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या विष्णू खोसेने कोल्हापूरच्या संतोष दोरवडला सुरवातीपासून वरचढ होऊ दिले नाही. समोरुन सुर मारुन एकेरी पट काढून त्याला पराभूत केले. पुणे येथील संदीप काळेपुढे सातारच्या राजेंद्र सूळची डाळ शिजली नाही. आक्रमक पवित्रा घेतलेल्या संदीपने घिस्सा डावावर राजेंद्रवर मात केली. प्रशांत शिंदे जाखणगांव आणि विकास सूळ सातारा यांच्या लढतीत प्रशांतने टाकलेल्या कुंडी डावावर विकासने भक्कम बचाव करीत तिथेच छडीटांग डावावर प्रशातला चितपट केले.
राघु ठोंबरे (ठोंबरेवाडी) संग्राम सुर्यवंशी (लांडेवाडी), आखिल शेख (औंध), मनोज कदम (नांदोशी), प्रुथ्वीराज पाटील (मांडवे) शरद पवार (पारगाव), अक्षय कदम (साप), रितेश सर्वगोड (येळीव), अनिकेत चव्हाण, (कोंबडवाडी), ,अमोल नरळे (सांगली), करण येवले, जयेश यादव (वडी), वैभव येवले (त्रिमली), साहिल शिंदे (अंभेरी), तेजस धमाले (सैदापूर), ओंकार सरगर (खडुस), ओंकार शिंदे, सुहेल शेख, विश्वजीत आमले कार्तिक शिंदे ,सनी इंगळे, (औंध) उदय लोंढे, मंगेश माने, प्रविण शेरकर (रहिमतपूर) यांनी प्रतिस्पर्ध्यावर नेत्रदीपक विजय मिळवून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच साक्षी मोरे, दिप्ती येवले, शिवानी जाधव, मोनाली गायकवाड, सानिया महानवर या महिला मल्लांनी चटकदार कुस्त्या केली.
पंच म्हणून सदाशिव पवार, आकाराम आमले, रसूल शेख, आप्पा इंगळे, के.टी कांबळे, नितीन शिंदे, किसन आमले, वसंत जानकर, नाथा धोत्रे, प्रा सुधाकर कुमकर, बाळासाहेब पडघम, आबा सूळ,अधिक जाधव, बापू चव्हाण, यांनी काम पाहिले.
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, संदीप मांडवे, शिवाजीराव सर्वगोड, नंदकुमार मोरे, प्रा. अर्जून खाडे, डॉ विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, डॉ महेश गुरव, प्रा बंडा गोडसे, सपोनि उत्तमराव भापकर, चंद्रकांत पाटील, नवल थोरात, हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, आबा सुळ, दत्तात्रय जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उमेश पाटील मांडवे आणि जोतीराम वाजे सांगली यांनी समालोचन करून मैदानाची रंगत वाढवली.
मैदानाच्या सुरवातीला धकटवाडीचे सुपूत्र शहीद जवान ज्ञानेश्वर जाधव आणि पारगावचे मल्ल शरद ठोंबरे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना उपस्थितांनी श्रध्दांजली वाहून अभिवादन करण्यात आले.









