प्रतिनिधी / राजापूर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ हजार हेक्टरवर सुपारी पिक घेतले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांपासुन हे पिक निसर्गातील सातत्यपूर्ण बदलामुळे धोक्यात आले आहे. परिणामी सुपारी उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. या पार्श्वभूमीवर पावसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी राजापूर दौऱ्यावर आलेल्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची भाजपाचे तालूका अध्यक्ष श्री अभिजित गुरव व शेतकरी मंदार नारायण सप्रे यांनी काही शेतकऱ्यांसह या दौऱ्या दरम्यान सुपारी फळगळ रोगाबाबत त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.
याबाबत झालेल्या चर्चेदरम्यान श्री दरेकर यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुपारी पिकाचा प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेत समावेश करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहितो असे आश्वासन दिले आहे. तसेच गतवर्षी सुपारी पिकाचे नुकसान पंचनामे लांजा तालूक्यात तहसील स्तरावर झाले होते त्याबाबत योग्य ती कार्यवाही राजापूर तालूक्यात होण्यासाठी दरेकर यांना निवेदन देण्यात आले.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तालुक्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
Previous Articleखेडशीत आर्थिक वादातून मारहाण, एकाला अटक
Next Article राज्य सरकारतर्फे होणार पक्षी सप्ताह









