प्रतिनिधी/ म्हसवड
केंद्र सरकारने स्वत:च्या हितासाठी संविधानाच्या विरोधात लागू केलेला सुधारीत नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आज शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी पक्षाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यास म्हसवडकर नागरीक व व्यापाऱयांनी आपली दुकान व्यावसाय उत्स्फूतपणे बंद ठेवून या सुधारीत कायद्याला कडाडून विरोध केला.
24 तारखेच्या महाराष्ट्र बंदविषयी जनतेत कसल्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये आणि हा बंद कोणत्या एका गोष्टीसाठी अथवा कोणत्याही वर्गाविरुद्ध नाही. हा बंद देशातील काही महत्वाच्या समस्यांना, मुद्यांना जगजाहीर करून जनतेत त्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आहे. म्हणून कृपया करून कोणीही जाणीवपूर्वक या बंदचा विरोध करू नये, असे आवाहन गुरुवारी वंचित आघाडीच्यावतीने करण्यात आले होते. त्याप्रमाणे आज म्हसवडकर नागरीकांनी आपली दुकाने बंद ठेवून सुधारीत कायद्याला विरोध केला. त्याबद्दल सर्व म्हसवडकर नागरीक व व्यापाऱयांनी बंदला विविध संघटना, विविध पक्षानी पाठींबा दिला.
म्हसवड पोलीस स्टेशने बंदसाठी शहरात ठिकठिकांनी बंदोबस्त ठेवला. त्यासर्वांचे आभार वंचित बहुजन आघाडीचे अंगुली बनसोडे, वंचितचे जिल्हा युवक उपाध्यक्ष रणजित सरतापे यांनी मानले. यावेळी कुमार सरतापे, संभाजीराव लोंखडे, आरपीआयचे महेश लोखंडे, शहारुख काझी, तेजेश रणदिवे, आनंद धाईजे, निलेश सरतापे आदींची उपस्थिती होती.









