कोरोनाच्या काळात आणि त्यापूर्वीपासूनही आपल्याकडे सदृढ शरीरासाठी, पौष्टिकतेसाठी सुकामेवा लोकप्रिय आहे. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड किंवा खारीक यासारखा सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे आपण जाणतो. पण मंडळी या सुकामेव्यामुळे काही नुकसानही होऊ शकते, ते तुम्हाला माहीत आहे का?
- सुक्या मेव्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर आपल्या शरीराला आवश्यक असतात. मात्र, त्याच्या प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने पचनतंत्र बिघडतं, असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे.
- सुकामेवा उष्ण असल्याने पाण्यात भिजवून खाणे फायद्याचे ठरते. त्याचबरोबर त्याचे प्रमाणही संतुलित असणे आवश्यक आहे. साधारणतः दिवसाला 5 बदाम खाणे ठिक आहे. याचे प्रमाण वाढवायचे असल्यास ते हळूहळू वाढवा. अन्यथा बद्धकोष्ठतेसह अनेक समस्या उद्भवू शकतात.
- सुकामेव्याच्या सेवनाने वजन वाढते. एका संशोधनानुसार, 3500 कॅलरी घेतल्याने 1 पौंड वजन वाढते. आहारात सुका मेवा घेतल्याने 250 कॅलरीज अधिक घेतल्या जातात. यानुसार एका महिन्यात 2 पौंड वजन वाढेल.
- सुक्या मेव्यात साखरेचे प्रमाण फ्रुक्टोज स्वरूपात असते. बाजारात मिळणारा सुका मेवा बरेचदा ड्रायफ्रूट मॉईश्चरपासून बचावासाठी त्यावर शुगर कोटिंग केलेला असतो. दातांच्या आरोग्यासाठी ते नुकसानकारक आहे. सुक्या मेव्यात ‘ग्लायसेमिक इंडेक्स’चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.तात्पर्य, सुकामेवा जरुर खा; पण तो प्रमाणशीरपणे खावा.









