मुंबई // वृत्तसंस्था
देशातील
कोरोना महामारीने भीतीचे वातावरण पसरले असून महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या प्रमुख
शहराना कोरोनाचा फटका अधिक बसला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट क्लब ऑफ
इंडियाने (सीसीआय) 1.1 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
चर्चगेट
येथे या ऐतिहासिक क्लबचे ब्रेबॉर्न स्टेडियम
असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीला 51 लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे
सीसीआयने आपल्या सदस्यांकडून 50 लाख रूपये गोळा केले असून एकूण 1.1 कोटी रूपयांची मदत राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी
दिली जाणार असल्याचे सीसीआयचे अध्यक्ष प्रेमल उदाणी यांनी सांगितले.









