अस्थीव्यंग, दंतोपचार, कान, नाक, घसा उपचार ओपीडी सुरू, मंगळवारी नेत्र विभाग सुरू होणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये 8 महिन्यांनंतर सोमवारी जुन्या अपघात विभागात बाह्यरूग्ण तपासणी विभाग सुरू झाला. सोमवारी दंतरोग, अस्थिव्यंग, कान, नाक, घसाविकार कक्षामध्ये बाहÎरूग्णांची तपासणी करण्यात आली. काही कक्षांची स्वच्छता सुरू होती. नव्या अपघात विभागा शेजारील नेत्र विभागाची सोमवारी स्वच्छता करण्यात आली. मंगळवारी नेत्रविभाग ही खुला होणार आहे.
कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल 1 मार्चला कोरोना आयसोलेटेड करण्यात आले. येथे फक्त कोरोना रूग्णांवर उपचार सुरू होते. सध्या दुधगंगा इमारतीत उर्वरित कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पोस्ट कोरोना ओपीडी जुन्या अपघात विभागात तळमजल्यावर सुरू आहे. कोरोना क्रोम वॉर्डमध्ये हायरिस्क रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रूग्णसंख्या घटल्याने 250 बेड नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले झाले आहेत. हृदयरोग वॉर्डमध्ये अद्यापी दोन कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळताच या वॉर्डचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे.
कोरोना रूग्ण एकाच इमारतीत स्थलांतरीत केल्याने अन्य वॉर्ड नॉनकोरोना आंतररूग्णांसाठी हळूहळू खुले होत आहेत. बुधवारपासून प्रसुती, स्त्रीरोगवॉर्ड खुला झाला आहे. मंगळवार पासून कान, नाक, घसा वॉर्ड आंतररूग्णांसाठी खुला होता आहे. काही ऑपरेशन थिएटर्सचे सॅनिटायझेशन झाले आहे. विभागप्रमुखांच्या रिपोर्टनंतर तेथील आयपीडी सुरू होणार आहे. सीपीआरमधील रूग्ण पोषण विभागाद्वारे आता कोरोना रूग्ण आणि नॉनकोरोना रूग्णांसाठी आहार दिला जात आहे, त्यामुळे येथील आऊटसोर्सिंग सप्ताहभरापुर्वी बंद झाले आहे.
सीपीआरमधील जुन्या अपघात विभागासमोर कोरोना, पोस्ट कोरोना बाह्यरूग्ण तपासणी सुरू आहे. याचवेळी याच इमारतीत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील विविध कक्षांत नॉनकोरोना रूग्ण तपासणी सोमवारी सुरू झाली. दंतचिकित्सा, कान, नाक, घसा, अस्थिव्यंग, याशिवाय एचआयव्ही रूग्णांची तपासणीही सुरू झाली आहे. सोमवारी या बाह्यरूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहुल बडे यांच्या कार्यालयात कोरोना वॉर रूम आणि नॉन कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन केले आहेत. सीपीआरमधील बाहÎ रूग्ण विभाग सुरू झाल्याने जिह्यातील नॉन कोरोना रूग्णांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी केले आहे.









