प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने सीपीआर फक्त कोरोना रूग्णांसाठी आयसोलेटेडची प्रक्रिया अंतीम टफ्फ्यात आहे. गुरूवारी सीपीआरमधील 90 टक्के नॉन कोरोना रूग्णांचे स्थलांतर झाले. सीपीआर पुन्हा कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल झाले आहे. कोरोना ओपीडी, कोरोना अपघात विभाग सुरू झाला आहे. सक्रीय रूग्णांची तपासणी करून त्यांचे वर्गीकरण केले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून ते आयसोलेटेड करण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्हय़ात गतवर्षी 1 मार्चला सीपीआर हॉस्पिटल कोरोना आयसोलेटेड झाले हेते, कोरोना नियंत्रणात येताच 1 नोव्हेंबरला ते 50 टक्के नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले झाले. पण जानेवारीत पुन्हा कोरोनाने डेके वर काढले अन् गेल्या दोन महिन्यांत सक्रीय रूग्णसंख्या अडीच हजारांवर पोहोचली. कोरोना रूग्ण वाढल्याने जिल्हाधिकाऱयांनी आठ दिवसांपुर्वी सीपीआर फक्त कोरोना रूग्णांसाठीच वापरण्याच्या सुचना दिल्या. तसेच नॉन कोरोना रूग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितले होते. गेली दोन दिवस येथील नॉन कोरोना रूग्ण जीवनदायी योजनेतील समाविष्ट हॉस्पिटलकडे पाठवले जात आहेत. बाहय़ रूग्ण विभागही लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात स्थलांतरीत केला आहे. फक्त ‘एमएलसी’शी निगडीत रूग्णच सीपीआरमध्ये तपासण्याची व्यवस्था केली आहे.
सीपीआर हॉस्पिटल 650 बेडचे आहे. पण कोरोना रूग्णांसाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने ही बेड संख्या 450 पर्यत आहे. त्यातील अधिकतर बेड ऑक्सिजनशी जोडले आहेत. गतवर्षी कोरोना रूग्णांना ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागला होता. पण सीपीआरमध्ये 2 हजार किलोचा ऑक्सिजन टँक उभारला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटला आहे. कोरोना श्वसनाशी निगडीत असल्याने रूग्णासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. रूग्ण वाढले तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कमी आहे. सक्रीय रूग्णसंख्या वाढल्याने सीपीआर कोरोना रूग्णांवर उपचारासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









