ओटवणे/ प्रतिनिधी-
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या पुढाकारातून कारीवडे गावातील मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून या सायकलींचे वितरण करण्यात आले.
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार मुलींना सायकल वितरण करण्यात येत आहे. याच योजनेतून कारिवडे गावातील मुलींना सायकल वितरण करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, कारिवडे सरपंचा अपर्णा आनंद तळवणेकर, कारिवडे उपसरपंच केशव साईल, माजी सरपंच लक्ष्मण गावकर, माजी उपसरपंच आलेक्स गोम्स, कारीवडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटये, भाजप शक्ती केंद्र प्रमुख कारिवडे आनंद तळवणेकर, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र भारमल, सोनु सावंत, आनंद परब आदी उपस्थित होते.









