सोनपात्रा, जगबुडी, वाशिष्ठी नद्यांचे पाणी झाले लालेलाल
प्रतिनिधी / चिपळूण
लोटे एआयडीसीतील सीईटीपीच्या पाईपलाईनचा व्हॉल्व उच्च दाबामुळे शुकवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या दरम्यान कोतवली-ब्राम्हणवाडी येथे उडाला आणि हे सांडपाणी सोनपात्रा नदीला जगबुडी व वाशिष्ठी नदीपात्रात मिसळून खाड्यांचे पाणी अक्षरश: लालेलाल झाले आहे. दरम्यान, उडालेला व्हॉल्व शुकवारी सकाळी 6.30 वाजता ग्रामस्थांच्या मदतीने बंद करण्यात आला.
याबाबत दाभोळखाडी पा†रसर संघर्ष सा†मतीने वारंवार ओरड करूनसुद्धा सीईटीपीच्या गलथान कारभारामुळे व चुकीच्या नियोजनामुळे आणि आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे मासेमारी करणाऱया भोई समाजावर सतत अन्याय होत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वारंवार बैठका, चर्चा करूनसुद्धा संबां†धत यंत्रणा भोई समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेची दाभोळखाडी परिसर संघर्ष समिती अध्यक्ष संजय जुवळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व यापुढे अशा सतत घडणाऱ्या घटनांना चाप बसण्याका†रता भोई समाज शांत बसणार नाही असा इशारा दिला. या घटनेची योग्यती खबरदारी न घेतल्यास सा†मतीच्या वतीने लवकरच आंदोलन करण्याचा इशारा जुवळे यांनी दिला आहे .