सहा ठिकाणी व्यवस्था : पं. स., नियोजन सभागृहात व्यवस्था
- पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राहणार उपस्थित
- सकाळी 11 वाजता होणार सुनावणी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडय़ावरील जनसुनावणी सोमवार, दि. 28 सप्टेंबरला रोजी घेण्याचे निश्चित असून ऑनलाईन जनसुनावणीसाठी लिंक देण्यात आली आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड, सावंतवाडी आणि कुडाळ या पाच तालुक्मयाच्या पंचायत समिती सभागृहात तसेच जिल्हा नियोजनच्या नव्या सभागृहात जनसुनावणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सुनावणीसाठी पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, चेन्नईच्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. सीआरझेडच्या आराखडय़ावर आतापर्यंत 2100 हरकती आल्या आहेत, अशीही माहिती देण्यात आली.
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी 18 जानेवारी 2019 रोजी नवीन सीआरझेड अधिसूचना, 2019 जाहीर केली. या अधिसूचनेच्या तरतूदीनुसार केंद्र शासन प्राधिकृत संस्थेमार्फत सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने हे काम राज्य शासनाने नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेन्ट, चेन्नई या केंद्र शासन प्राधिकृत संस्थेस दिले होते. या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे, 2019 तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे.
त्या अनुषंगाने सीआरझेड अधिसूचना, 2019 नुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना, हरकती आमंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने सुनावणीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यासाठी अवर सचिव, पर्यावरण यांनी 27 मार्चला आयोजित करण्यात आलेली सुनावणी कोरोना महामारीच्या विषाणू उदेकामुळे स्?थगित केली होती. त्यानंतर पर्यावरण विभाग सचिवांनी प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडय़ांवरील (CZMPs) जनसुनावणी डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्याचे जाहीर केले आहे. लाईव्ह सुनावणीत 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता सहभागी होता येईल. सदरील सुनावणीत सहभागी होण्याकरिता https ://mh-dit.webex.com/mh-dit/j.php?MTID=m41deef9ddf8c71ca9f25de09e6157a ही लिंक देण्यात आली आहे. या लिंकचा आयडी CISCO WEBEX IP -1705314414 आणि Password-sindhu आहे. या लिंकची माहिती https://sindhudurg.nic.in या संकेतस्?थळावर प्रसिध्?द करण्यात आली आहे.
नेटवर्क नसेल त्यांच्यासाठी व्यवस्था
किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडय़ावरील जनसुनावणीची तयारी करण्यात आली असून ज्या नागरिकाना नेटवर्क मिळत नाही किंवा ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याची व्यवस्था नाही, अशा नागरिकांना जनसुनावणीत सहभागी होता यावे, यासाठी देवगड, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या जिल्हा नियोजन सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे.
या जनसुनावणीसाठी पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मेरीटाईम बोर्ड या विभागाचे अधिकारी, चेन्नईच्या संस्थेचे प्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सीआरझेड आराखडय़ावर आतापर्यंत 2100 हरकती आल्या आहेत. या हरकती मोठय़ा प्रमाणात असल्या तरी बऱयाच हरकती एकसारख्या आहेत. त्यामुळे त्यांची विगतवारी करून सुनावणी घेतली जाणार आहे.









