प्रतिनिधी / चिकोडी
येथील सी. बी. कोरे सहकारी साखर कारखान्यातील 18 वर्षावरील कर्मचाऱयांना कोरोना लसीकरण करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवने, उपाध्यक्ष मल्लकार्जुन कोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवने यांनी डॉ. प्रभाकर कोरे व राष्ट्रीय सहकारी साखर महामंडळाचे संचालक अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यातील कर्मचाऱयांच्या कोरोना लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरण करुन घेतल्यानंतरही सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच कोरोना मुक्तीसाठी प्रत्येकांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
उपाध्यक्ष मल्लकार्जुन कोरे यांनी बोलताना, एकसंबा व केरुर येथील सरकारी आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने कारखान्यातील 650 कर्मचारी व परिसरातील 200 नागरीक मिळून 850 लसी देण्यात येत आहेत. गळीत हंगामात ऊसतोडीसाठी व इतर कामासाठी येणाऱयांनाही लसी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. टी. देसाई, प्रधान व्यवस्थापक अरुण एस., एस. एस. बेवूर, आर. डी. निगवे, संजीव दुबे, ए. बी. चौगुला, एस. एल. हकारे, कार्यालय अधिक्षक एस. जी. सुभेदार, सी. जी. बुकीटगार, एल. पी. पाटील, के. जी. पाटील, डॉ. पी. आय. खडकभावी उपस्थित होते.









