जिल्हा रूग्णालय प्रशासन हादरले, प्रसुती झालेल्या 5 माता, नर्स पॉझीटीव्ह
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट झाला असून शुक्रवारी दिवसभरात 35 नवे पॉझीटीव्ह रूग्ण सापडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रसुती विभागातील 5 माता व एका नर्सला कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य हादरली आहे. प्रसुतीसाठी आलेल्या 21 महिलांना क्वारंटाईन करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱयांसह कर्मचाऱयांची तपासणी केली जात आहे. दिलासायदायक बाब म्हणजे सर्व नवजात बालके मात्र निगेटीव्ह आहेत.
जिल्हा शासकीय रूग्णालयाचे कोवीड रूग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र प्रसुती विभाग तेथेच ठेवण्यात आला आह़े या विभागातील महिला नर्सचा कारोना अहवाल पॉ†िझटिव्ह आला होत़ा त्यामुळे प्रसुती विभागात दाखल असलेल्या 21 महिला, नवजात बालके, 2 वैद्यकीय अधिकारी, नर्स व इतर कर्मचारी यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.
शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये प्रसुती विभागातील 5 महिलांचे अहवाल पॉ†िझटिव्ह आल़े मात्र समाधानाची बाब म्हणजे नवजात बालके, वैद्यकीय अधिकारी इतर स्टाफ यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे समोर आले आह़े जिल्हा रूग्णालयात एकाच वेळी 5 पॉ†िझटिव्ह रूग्ण आढळल्याने शुक्रवारी रात्रभर प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरू होती. प्रसुती विभागातील 21 महिलांना कॉरंटाईन करण्यात आल़े
जिल्हाभरात शुक्रवारी सायंकाळी 35 जणांचे अहवाल पॉ†िझटिव्ह असल्याचे आढळून आले होत़े रत्नागिरीत 15 यामध्ये भाटय़े, चर्मालय, समर्थनगर, मारूतीमंदीर, मालगुंड, साठरेबांबर, नवेल, कुवेशी, राजीवडा येथील प्रत्येकी 1 तर शिरगाव व गावडे आंबेर येथे प्रत्येकी 2 रूग्ण आढळून आले आहेत़ तर राजापूर तालुक्यात धाऊलवल्ली 1, लांजात इसवलीत 1, चिपळूणमध्ये शहर व ओवळीत प्रत्येकी 1, तर कापसाळ मध्ये 2 रूग्ण आढळून आल़े तसेच दापोलीत आडे व विसापूरमध्ये प्रत्येकी 2, हर्णेत 1, खेड तालुक्यात भरणे 2 व घरडा लवेल 1 अशा 35 जणांचा समावेश आहे.
आईच्या दुधापासून कारोनाचा धोका नाही
नुकत्याच प्रसुती झालेल्या 5 महिलांना कारोनाची लागण झाली आह़े या महिलांच्या नवजात बाळांना आईचे दुध देण्यात येणार आह़े दुधातून कारोनाची लागण होत नाह़ी तसेच नवजात बाळांसाठी आईचे दुध हेच अत्यावश्यक असत़े त्यामुळे सुर†िक्षतता बाळगून या बाळांना आईचेच दुध दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातील ड़ॉ फुले यांनी दिल़ी
खेड शहरात कोरोनाचा शिरकाव
खेडः शुक्रवारी रात्री उशीरा तालुक्यातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 71 झाली आहे. शहरातील एकविरानगर येथे वास्तव्यास असलेल्या व तालुक्यातील फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील महालॅबमध्ये कार्यरत कर्मचारी बाधीत झाल्याने शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीत घरडा कंपनीतील व्यवस्थापक व भरणे येथील दोघे पॉझीटीव्ह आढळले आहे. एकविरानगरातील बधितांच्या कुटुंबातील 7जणांचे स्वॅब घेण्यात आले. पिरलोटे वसाहतीत वास्तव्यास असलेल्या घरडा कंपनीतील व्यवस्थापकाच्या संपर्कातील 27 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे.
धाऊलवल्लीत नवा रूग्ण राजापूरः धाऊलवल्ली येथे शुक्रवारी नवा रूग्ण सापडला असून तालुक्यातील रूग्ण संख्या 36 झाली आहे. केवळ तीन रूग्ण उपचार घेत असतानाच शुक्रवारी त् धाऊलवल्ली येथे 60 वर्षीय रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.









