ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लसीच्या व्यवसायिक निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर ‘सिरम’च्या ‘कोविशिल्ड’ लसीची ब्राझील आणि माेराेक्काे या दोन देशांना निर्यात करण्यात आली. आराेग्य सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी यासंदर्भात माहिती दिली.
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीची भारतात सिरम इन्स्टिट्यूट ‘कोविशिल्ड’ नावाने निर्मिती करत आहे. या लसीला भारताबाहेर अनेक देशांकडून मागणी आहे. सुरुवातीला नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि मालदीव या देशांना काही लसी मोफत देण्यात आल्या होत्या.
आता व्यावसायिक दृष्टिकोनातून ब्राझील आणि माेराेक्काे देशांना निर्यात करण्यात आली आहे. सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिकेलाही या लसीची निर्यात करण्यात येणार आहे.