ऑनलाईन तीन/तरुण भारत
पंजाब काँग्रेसमध्ये (punjab congress) गेल्या महिन्याभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी (navjot singh sidhu) राजीनामा दिला होता. मात्र आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले असून राजीनामा मागेही घेतला आहे. दरम्यान, आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ४ पाणी पत्र (letter) लिहून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सिद्धूंनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहलेल्या पात्रात त्यांनी १३ मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. यापैकी १२ मुद्दे हे ड्रग्ज, कृषी, वीज, सरकार आणि वीज कंपन्या यांच्यातील करार रद्द करणं तसंच इतर काही गोष्टींमध्ये न्याय मिळावा यांचा समावेश आहे. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग (amarinder singh) यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले असून राजीनामा मागेही घेतला आहे. परंतु, आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काही महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. या पत्रात सिद्धू यांनी १३ मुद्दे मांडत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.