बेंगळूर : राज्य काँग्रेसमधील पदाधिकाऱयांच्या नेमणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना हायकमांडने मंगळवारी दिल्लीला बोलावून घेतले होते. बुधवारी उभयतांशी राहुल गांधी यांनी चर्चा केली असून त्यांच्याकडून पदाधिकारी नेमणुकीसाठी यादी स्वीकारली. 2023 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीची काँग्रेसमध्ये तयारी सुरू झाली असून मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या गटामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. याच दरम्यान पक्षातील पदाधिकाऱयांच्या निवडीवेळी आपल्या समर्थकांनाच अधिक संधी मिळावी यासाठी उभय नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करून एकत्रितपणे राहूनच पक्षसंघटनेची कामे करावीत. पक्षात वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









