बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. बेंगळूरच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात ७२ वर्षीय कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी, गेल्या महिन्यात १५ मार्च रोजी, त्यांनी याचा रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला होता.









