ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटात भारताला आर्थिक हातभार लागावा यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने भारताला 36 लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सीडीसीचा हा निधी वापरता येणार आहे. सिडीसी ही अमेरिकेची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था आहे.कोरोना टेस्टिंग वाढवणे, अद्ययावत वैद्यकीय साहित्य, चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची क्षमता वाढवणे, यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल.









